अक्षरशः केवळ दैवयोग होता म्हणून मी आज अंकल सॅमच्या देशात येऊन पोचलो आहे.
साधारण वर्षभरापूर्वी सुद्धा अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्याचा विचार मुळीच नव्हता.
पण 'आलं देवाजीच्या मना-तेव्हा कुनाचं चालेना' !
उन्हाळ्यात एक महीनाभर संघशिक्षावर्ग, मग गुजरात-संभाजीनगर-पुणे-चेनै-बेंगळूरु-गुडगाव असा सगळा प्रवास, आणि जवळपास २ महिने नागपुरात खास मित्रांसोबत खास नागपुरी ऐश करत करत जाण्याचा दिवस कधी उगवला ते कळलंच नाही. 'लांबचा पल्ला' असल्याने (घरच्यांना) 'कस्सं हुईल-काय हुईल' होत होतं. पण अनेक मित्र-नातेवाईकांकडून असंख्य टिप्स मिळाल्या असल्याने मी निश्चिंत होतो. ('त्यामुळेच माझी चिंता वाढते', असं आई म्हणते - त्यातच माझ्या एक आठवडा अगोदर निघालेल्या मित्रांचे न्यूयॉर्क मध्ये आयरिन वादळाने स्वागत केल्यामुळे घरचं वातावरणही जरा अस्थिर होऊ लागलं होतं, पण आयरिन पण शांत झालं, अन् आमचं घर पण).
घरचा दीड दिवसाचा गणपती पूर्ण करून २ सप्टें ला संध्याकाळच्या विमानाने मुंबईला निघालो. सोबत आई-बाबा-मधुरा असे तीन प्रवासी असल्यामुळे माझं इंटरनॅशनलचं भलं-थोरलं लगेज डोमेस्टिकमध्ये सुद्धा जमवून घेतलं गेलं. चेक-इन करून आत गेलो, आणि नाट्याच्या पहिल्या अंकाची सुरुवात झाली. नागपूर-मुंबई विमानच लेट! पुढचं विमान वेळेत गाठता येईल की नाही याची चिंता सुरू. माझं नागपूर-मुंबई विमान इंटरनॅशनल तिकीटाचा भाग नसल्याने ते चुकलं तर कुणाची गच्ची धरता येणार नव्हती! तसा पुरेसा वेळ होता दोन्हीत, पण 'कस्स हुइल' ! शेवटी एकदाचं आमचं विमान मुंबईत पोचलं. सामान वगैरे घेऊन टर्मिनलवर आलो. डोमेस्टिक वरून इंटरनॅशनलला जायला दोन पर्याय आहेत: एक, ज्यांचं इंटरनॅशनलचं तिकीट आहे, त्यांच्याकरता विमानतळाची निःशुल्क बससेवा आहे; दोन, बाहेर जाऊन स्वतंत्र टॅक्सी करून पण जाता येतं. बाहेरून गेल्यास ट्रॅफिक जॅम असल्यास आणखी उशीर होईल या कल्पनेने मी आपला अंतर्गत बससेवेच्या रांगेत उभा राहिलो, अन् या तिघांनी बाहेर जाऊन टॅक्सी केली. आणि- ती रांग काही पुढे सरकायलाच तयार नाही. माझा मित्र अभिजीत इंटरनॅशनलच्या टर्मिनलवर पोचल्याचा फोन आला. अनी अन् छायामामी माझं जेवण घेऊन पोचले. ट्रॅफिकजॅम इ. अडथळ्यांची शर्यत पार करून ती टॅक्सी पण जाऊन पोचली, अन् मी आपला रांगेत उभा ! वर पाऊस सुरू झालेला अन् 'संपूर्ण विमानतळ परिसरात काही ना काही बांधकाम सुरू आहे-त्यामुळे बसला लेट होत असेल' अशी बातमी देणारे रांगेतले 'नारू'. माझं इकडे 'ठेविले अनंते तैसेचि रहावे-चित्तीं असू द्यावे समाधान', अन् तिकडे आईचं 'कस्सं हुईल'. शेवटी अनंतें आम्हांस ससामान उचलून बशीत ठेविले अन् तीस ससमय सुस्थानी पोचविले. मी, टर्मिनल अन् चेकइनची वेळ यांची गाठ पडल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला, अन् मग मामीनी आणलेला दूधभात माझ्या पोटात पडला. गौरव पण धावत-पळत आला होता, सर्वांना भेटून आनंद झाला.
मग रांग कापत-कापत अन् प्रत्येक पावलावर मागे वळून बघत-बघत त्या दारातून आत शिरलो, अन् आतल्या दुनियेचा भाग बनलो. दोन-अडीच तास आधी चेकइन करून काय करवणार आहेत, या प्रश्नाचं उत्तर मिळू लागलं होतं. सामानाचं वजन करून बोर्डिंग पास घेणं, खांद्यावरच्या बॅगला पट्ट्या लावणं, इमिग्रेशनचे फॉर्म भरणं, सेक्युरिटीवाल्यांच्या मेटल डिटेक्टरनं स्वतःची आरती अोवाळून घेणं - अन् या सगळ्यासाठी नागमोडी रांगांमधून इंच-इंच सरकत राहणं यात वेळ असाच निघून गेला. अखेर ऍमस्टरडॅमगामी डेल्टाविमानात जाऊन स्थानापन्न झालो अन् आईला फोन केला. एयरलाइन्सनी एक उशी अन् एक चादर दिली होती - झोपणे का मस्त जुगाड हो गया. प्रत्यक्ष उड्डाण होईपर्यंत जागा राहिलो, विमान धावू लागल्यावर देवबाप्पाला नमस्कार केला, अन् मग नकळत केव्हातरी झोपी गेलो. मुंबई-ऍमस्टरडॅम-डिट्रॉइट हा प्रवास तसा काही विशेष न घडताच गेला. दोन उल्लेखनीय गोष्टी: एक, आजवर शरीराच्या ज्या भागाला केवळ पाण्याचा स्पर्श अवगत होता, त्याला प्रथमच कागदाचा स्पर्श झाला; अन् दोन, ढगांच्या वरतून पाहिलेला सूर्योदय अप्रतीम होता.
डिट्रॉइटला इमिग्रेशन तपासणी झाली. भारतीय प्रवाशांनी भात, जीरा आणला असेल तर काढून घेतात असं ऐकलं होतं, ते घडताना पण बघितलं. परांजपेकाकूंचा 'डाएट फूड'चा मंत्र असल्यामुळे आईने दिलेले लाडू अन् पुरणपोळी मी त्यांच्या तावडीतून काढू शकेन याची खात्री होती. पण माझी बॅग अडवली गेली वेगळ्याच कारणासाठी. माझ्या एका बॅगमध्ये दोन चिलटाएवढे किडे त्यांच्या स्कॅनरने पकडले (पावसाळ्यातले किडे-कोणत्या तरी कपड्यासोबत आले असतील, त्यातला एक मेलेलाच होता). मग तो गोरा पांडू बॅग उघडून चिमट्याने त्या किड्याला टेस्टट्यूबमध्ये टाकून लॅबमध्ये घेऊन गेला (मला पुलंच्या 'माशी' ची आठवण आली). थोड्यावेळाने परत येऊन 'यू आर गुड. हे किडे आमच्याकडेपण असतात' असं काहीतरी म्हणाला. माझं सामान उकरताना त्याला पोळपाट सापडला अन् त्याचा उपयोग सांगितल्यावर त्याला खूपच आनंद झाला होता. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या सगळ्या किडे-प्रकरणातही त्याचं माझ्याशी वागणं खूपच सभ्य होतं.
डिट्रॉइट-कोलंबस हा एक तासापेक्षाही कमी असा प्रवासाचा शेवटचा टप्पा, पण खरे भुवया उंचवणारे अनुभव इथेच आले. माझ्या दोन मोठ्या सूटकेसेस तर परस्पर लगेजमध्ये गेल्या होत्या, पण हँडबॅग म्हणून जी मी घेतली होती, ती सुद्धा या विमानकंपनीच्या मापापेक्षा मोठी होती. जास्तीचे पैसे द्यावे लागणार की काय, या चिंतेत मी असतानाच त्या अटेंडंट बाईने एक गुलाबी चिठ्ठी माझ्या हाती देऊन सांगितलं की 'या बॅग ला विमानाच्या लोकल लगेज मध्ये टाक'. ते करून आत गेलो अन् थक्कच झालो. आपल्या कडे स्वराज-माझ्दाची १५-२० सीटर बस असते ना, तसं २-बाय-१ विमान होतं. उंचीलाही बेताचंच - माझं डोकं छताला लागत होतं. अन् एकून प्रवास पण तासाभरात आटोपला; मला तर क्षणभर एखाद्या अम्युझमेंट-पार्क मधल्या राईड सारखंच वाटलं. पण कोलंबस ही माझी अम्युझमेंट नसून 'अरे संसार संसार' आहे.
लगेजपाशी पोचलो. वेणु घ्यायला आला होताच. त्याच्या भरवशावरच मी बराच निश्चिंतपणे आलो आहे. पट्ट्यावरून बॅगा फिरत असताना त्याने एक छान टिप दिली - बॅगच्या हँडलला रिबिनीसारखं काही बांधलं की ओळखायला सोपं जातं. सामान घेऊन आम्ही घरी आलो. इथे होता अमेरिकेतील माझा पहिला रूममेट - जतिन गुप्ता, अन् अमेरिकेतील माझा पहिला पत्ता - १३८२ हायलँड स्ट्रीट, अपार्टमेंट सी-४, कोलंबस !

0 comments:
Post a Comment