वेणु व जतिन मुळे पूर्णपणे सेट झालेलं घर मला मिळालं होतं. त्यामुळे इतरांच्या तुलनेत सेटल व्हायला बऱ्यापैकी कमी वेळ लागला.
यापूर्वी स्वयंपाकाचा अनुभव असा नव्हताच. किंबहुना स्वयंपाक या शब्दात 'स्वयं' आहे, हा विचार पण कधी केला नव्हता. सुरुवातीचे बरेच दिवस आईनी दिलेल्या खाऊवर गेले. मग जतिनच्या मदतीने कुकर लावणे वगैरे प्रकार सुरु केला. आईने वरण-भात-भाजी-खिचडी इ. ची सोपी रेसिपी शिकवून व लिहून पण दिली होती. त्या भांडवलावर प्रयोग सुरु झाले. पाण्यात पडल्यावर पोहायला येणारच या उक्तीनुसार हळुहळू एक-एक गोष्ट जमू लागली. एकदा मी अन् जतिन ने हिमतीने गाजराचे पराटे केले. चांगले जमले. हिंमत वाढली. मध्यंतरी जयश्रीने इंटरनेटवर चांगल्या महाराष्ट्रीय रेसिपीज् कुठे मिळतात त्याची माहिती दिली. मग त्यानुसार प्रयोग सुरू झाले. आता तोंडलीभात, कढी, पराटे, खिचडी, कोबी, पत्ता किंवा दुध्याची भाजी असे पदार्थ स्वतंत्रपणे करण्याचा आत्मविश्वास आला आहे. अजूनही रोज सकाळी उठून सैपाक करून डबा घेऊन जातो असं नाही, पण पोट भरण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज उरली नाहीये.
अमेरिकेत चविष्ट अन् पौष्टिक खाऊन वर बँकेत शिल्लक देखील राखायची असेल तर स्वयं-पाकाशिवाय दुसरा उपाय नाही. सुदैवाने कोलंबस परिसरात अनेक भारतीय परिवार असल्याने भारतीय वस्तूंची २-३ दुकानं पण आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या भाज्या, मसाले इ. पदार्थ सहज मिळतात.
सैपाकाला पर्याय म्हणजे ५ ते ८ डॉलर खर्च करून हॉटेलात जेवणे (डॉलरचं रूपयात धर्मांतर करू नका, हा भाव इथे बऱ्यापैकी परवडेबल आहे). आमच्या घरापासून व कँपसपासूनही जवळच नॉर्थ-हाय-स्ट्रीट नावाची 'खाऊ-गल्ली' आहे. या रस्त्यावर सर्व प्रकारची दुकानं आहेत. मी साधारणतः सबवे, चिपोटले (हे चितळेंचे बंधु वगैरे नाहीत, मेक्सिकन रेस्टॉरेंट आहे) किंवा नूडल्स-अँड-कंपनी मध्ये खातो. कधीमधी मित्रांसोबत पिझ्झा पण होतोच. पिझ्झाहट् किंवा डॉमिनोज् पेक्षा इथला डोनॅटोज् चा पिझ्झा मला जास्त आवडला. मांसाहार करणाऱ्यांची तर ऐशच आहे, पण शुद्ध शाकाहाऱ्यालाही इथे काही अडचण नाहीये. वजन-फिगरच्या चिंतेतून कोणत्याही पदार्थाचे शुद्ध व्हेजीकरण करणारी एक जमात इथे आहे (त्यासोबत ते कोकाकोला घेऊन कॅलरीज् चं गणित पूर्ण बिघडवतील हा भाग वेगळा). त्याशिवाय मांस तर सोडाच कोणताही प्राणीजन्य पदार्थ (दूध, दही, चीज् इ.) वर्ज्य मानणारं 'व्हेगन' नामक नवं खूळ सध्या इथे बाळसं धरू लागलंय. त्यामुळे असे (अति)शुद्ध शाकाहारी पदार्थ सर्वत्र मिळू शकतात. अनेक रेस्टॉरेंट्समध्ये काही सामान्य पदार्थांच्या बाजूला 'हा पदार्थ व्हेगन पद्धतीने देखील बनवून मिळेल' असं लिहीलेलं असतं.
याशिवाय आपली पूर्वपुण्याई, संघ- व मित्र-परिवाराचं प्रेम असे काही ग्रह अनुकूल असले की अधूनमधून शुद्ध भारतीय पद्धतीचे पंचपक्वान्नयुक्त भोजन प्राप्त होण्याचा योग पण असतो. पण त्याचं लक्ष्मीसारखं आहे. आपण तिच्या मागे धावलो नाही तर(च) ती आपल्या मागे येते.

0 comments:
Post a Comment