Tuesday, April 3, 2012

Veer Vivekananda

Following is an inspiring Marathi song about Swami Vivekananda.
I heard this song for the first time in January at the National Yuva Varg, Houston.
This song was created in 1963, as a part of Swamiji's birth centenary celebrations.
Next year is his 150th birth anniversary. Remembering the song again.



हे वीर विवेकानंद ! हे वीर विवेकानंद !
हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती
हे युवकप्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ।। ध्रु ।।

दास्यात पाहूनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ।। १ ।।

शतआघातांनी कुंठित-मूर्छित झाली
ही हिंदुचेतना फिरुनी तू चेतविली
तिज उन्नत-मस्तक निर्भय केले जगती ।। २ ।।

स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद
जग जिंकायाची ईर्ष्या दाटो चित्ती ।। ३ ।।

तव अमृतवाणी हाक देत आम्हांते
हे अतुलबलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ती हवी मज कार्यचरणपुरुषार्थी ।। ४ ।।

जी जीवनपुष्पे सतेज नवरक्ताची
स्थापावा त्यांनी धर्म आत्म अर्पूनी
त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची ।। ५ ।।