Thursday, February 18, 2010

चहास्तोत्रम्

आमचे परम मित्र श्री. निनाद साने यांनी नुकतेच मला एक महाबलशाली 'चहास्तोत्र' पाठविले. त्या स्तोत्राची महत्ता लगेचच पटल्याने त्या स्तोत्राचे रचयित्या मनोमन नमन केले. तेव्हा श्रीवागीश्वरीने प्रसन्न होऊन अस्मादिकांकडून त्या स्तोत्राची फलश्रुती लिहून घेतली. आमच्या या कृतीचा वाचक सुहास्यवदनाने स्वीकार करतील, असा विश्वास आहे.
ते स्तोत्र फलश्रुती येथे देत आहे. सर्वांनी लवकरात लवकर हे स्तोत्र कंठस्थ करून त्याचे विधिवत् पठण करावे चहामृत-रूपी फलाची प्राप्ती करून घ्यावी, ही नम्र विनंती.









विद्यार्थी लभते डिप्-डिप्, धनार्थी लभते फुकट् |
आरोग्यार्थी-कृते गवती, मधुमेही शुगरफ्री मधुर् || १‌ ||
चहास्तोत्रम् महासिद्धम् प्रातर्नित्यम् पठन्ति ये |
न तद्-कृते दिनारम्भम् विना-चाहं युगे युगे || २ ||
सायं-प्रातः पठेन्यस्तु, लभेत् सदा आसाम-चहा |
त्रिसंध्यं यः पठेत् चापः, इच्छाचाही तु सः भवेत् || ३ ||
भावार्थ‌:
१. विद्यार्थ्याला डिप्-डिप् चहा, पैशाची चिन्ता करणार्याला फुकट, चांगल्या आरोग्याची कामना करणाऱ्याला गवती चहा, तर मधुमेही मनुष्याला शुगरफ्री साखरेचा पण गोड चहा, या स्तोत्राच्या पठणाने मिळतो.
२. हे महासिद्ध असे चहास्तोत्र जे रोज सकाळी म्हणतील, अनेकानेक युगांपर्यंत त्यांचा दिनारंभ चहाविना होणार नाही (रोज सकाळी उठल्यावर चहा नक्की मिळेल).
३. जो सकाळ-संध्याकाळ पठण करेल, त्याला सदैव आसाम चहा मिळेल. जो चाप (= चहा पिणारा) दिवसातून तीन वेळा हे स्तोत्र म्हणेल, तो 'इच्छाचाही' (=इच्छा करताच चहा प्राप्त करणारा) बनेल.

Sunday, February 14, 2010

Khan you answer these questions ?

Craze of movies and cricket in India (it's not much different in other countries, either) is at such a level that we idolize a good performer, and forget to keep his personal life and screen-/field-life separate. Both the fans and bashers end up loving/attacking their movie/game based on their opinion of the person.

The reason I am writing all this is, currently Shah Rukh Khan is under criticism for his comments about Pakistan and a political party has decided to take out their anger on his movie, My Name is Khan.
I distaste their way of protests, but I am equally apprehensive of his fans blindly ignoring the actual issue, saying "Yeh shivsena waalo ko to bahaana chahiye rada karne ko.." Although their way may be wrong, the issue can't be just ignored.

Various questions are raised about SRK's comments on Pakistan and related issues in recent times. Most of them are summarized in a long-but-a-well-written open-letter by Arindam Bandyopadhyay at http://www.blogs.ivarta.com/Open-letter-Mr-Shahrukh-Khan-SRK/blog-348.htm.

I hope Mr. Khan answers these questions soon, so that we can make a well-informed opinion about this great actor, but probably an irresponsible 'idol'.

---

PS: As shivsena started attacking theaters, Maharashtra government deployed several of its policemen to guard them. Then the blasts in Pune, killing 9 innocent people, occurred. Some gtalk/orkut/facebook/buzz comments said:
1. When 40 Police person will protect one movie theater and 13K police will protect one Rajkumar then why we are so much surprised about Pune bomb blast! It's almost expected.
2.
Deputy CM:-We had intelligence report about the possible terror attacks'. (Haaaa..Ha..I guess, they must have read it as 'theatre' attacks)

Friday, February 12, 2010

खारवेल: सुनीतिमान् !

देशाच्या खऱ्या शत्रूला विसरून स्वकीयांशीच लढणाऱ्या स्वार्थी, अ-दूरदर्शी राजनेत्यांना सुनीतिमान् खारवेल राजाचे स्मरण सद्बुद्धी देवो.

लोकसत्ता १० फेब्रुवारी
"कथासार"
खरा शत्रू कोण ?
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=46477:2010-02-09-15-05-46&catid=61:2009-07-20-04-02-48&Itemid=74#JOSC_TOP


मगध देशाचा राजा सम्राट अशोकने कलिंग देशावर स्वारी करून कलिंगवासीयांचा पराभव केला. या युद्धात कलिंग देशाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कलिंगवासीयांमध्ये मगध साम्राज्याविषयी विलक्षण चीड निर्माण झाली. कालांतराने कलिंग देशावर खारवेल नावाचा राजा सत्तेवर आला. तो अतिशय पराक्रमी होता. मगध साम्राज्याला धडा शिकविण्यासाठी तो अतिशय उत्सुक होता. त्याप्रमाणे त्याने संपूर्ण तयारी करून मगध देशावर आक्रमण करायचे ठरविले. मात्र त्याचवेळी त्याला कळले की, ग्रीकचा राजा डेमेट्रीअस हादेखील प्रचंड सेना घेऊन मगध देशावर स्वारी करणार आहे. एका दृष्टीने खारवेलाला अनुकूल ठरणारी अशीच ही गोष्ट होती. परंतु खारवेलने अधिक विचार केला असता त्याच्या असे निदर्शनास आले की, शेवटी ग्रीकचा राजा डेमेट्रीअस हा परकीय आहे आणि मगधचा राजा आपलाच देशबांधव आहे आणि आपला देशबांधव हा शत्रू असला तरी त्याच्या पराभवासाठी परकीय शत्रूला मदत करणे उचित ठरणार नाही.
इकडे राजा डेमेट्रीअसलाही खारवेल मगध देशावर स्वारी करणार असल्याचे वृत्त समजले होते. एका बाजूने खारवेल व दुसऱ्या बाजूने आपण चाल करून गेलो तर मगध देशाचा लगेचच पाडाव होईल, अशी स्वप्ने डेमेट्रीअस पाहत होता.
परंतु खारवेलने आपला निर्णय ऐनवेळी बदलला व मगध देशावर स्वारी करण्याऐवजी तो डेमेट्रीअस राजावरच चालून गेला. डेमेट्रीअसला हे जेव्हा कळले की, खारवेल आपला आधीचा निर्णय बदलून आपल्यावरच चाल करून येत आहे तेव्हा तो घाबरला. कारण त्याला खारवेलचा पराक्रम माहीत होता आणि तो अक्षरश: भारतातून पळून गेला. त्यानंतर कोणत्याही ग्रीक राजाने भारताकडे वाकडी नजर केली नाही. त्याला कारणीभूत ठरले खारवेलचे देशप्रेम. ‘खरा शत्रू’ कोण हे खारवेलने वेळीच ओळखल्यामुळे परकीय शत्रूपासून मगध राज्याचे संरक्षण झाले.