Friday, February 12, 2010

खारवेल: सुनीतिमान् !

देशाच्या खऱ्या शत्रूला विसरून स्वकीयांशीच लढणाऱ्या स्वार्थी, अ-दूरदर्शी राजनेत्यांना सुनीतिमान् खारवेल राजाचे स्मरण सद्बुद्धी देवो.

लोकसत्ता १० फेब्रुवारी
"कथासार"
खरा शत्रू कोण ?
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=46477:2010-02-09-15-05-46&catid=61:2009-07-20-04-02-48&Itemid=74#JOSC_TOP


मगध देशाचा राजा सम्राट अशोकने कलिंग देशावर स्वारी करून कलिंगवासीयांचा पराभव केला. या युद्धात कलिंग देशाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कलिंगवासीयांमध्ये मगध साम्राज्याविषयी विलक्षण चीड निर्माण झाली. कालांतराने कलिंग देशावर खारवेल नावाचा राजा सत्तेवर आला. तो अतिशय पराक्रमी होता. मगध साम्राज्याला धडा शिकविण्यासाठी तो अतिशय उत्सुक होता. त्याप्रमाणे त्याने संपूर्ण तयारी करून मगध देशावर आक्रमण करायचे ठरविले. मात्र त्याचवेळी त्याला कळले की, ग्रीकचा राजा डेमेट्रीअस हादेखील प्रचंड सेना घेऊन मगध देशावर स्वारी करणार आहे. एका दृष्टीने खारवेलाला अनुकूल ठरणारी अशीच ही गोष्ट होती. परंतु खारवेलने अधिक विचार केला असता त्याच्या असे निदर्शनास आले की, शेवटी ग्रीकचा राजा डेमेट्रीअस हा परकीय आहे आणि मगधचा राजा आपलाच देशबांधव आहे आणि आपला देशबांधव हा शत्रू असला तरी त्याच्या पराभवासाठी परकीय शत्रूला मदत करणे उचित ठरणार नाही.
इकडे राजा डेमेट्रीअसलाही खारवेल मगध देशावर स्वारी करणार असल्याचे वृत्त समजले होते. एका बाजूने खारवेल व दुसऱ्या बाजूने आपण चाल करून गेलो तर मगध देशाचा लगेचच पाडाव होईल, अशी स्वप्ने डेमेट्रीअस पाहत होता.
परंतु खारवेलने आपला निर्णय ऐनवेळी बदलला व मगध देशावर स्वारी करण्याऐवजी तो डेमेट्रीअस राजावरच चालून गेला. डेमेट्रीअसला हे जेव्हा कळले की, खारवेल आपला आधीचा निर्णय बदलून आपल्यावरच चाल करून येत आहे तेव्हा तो घाबरला. कारण त्याला खारवेलचा पराक्रम माहीत होता आणि तो अक्षरश: भारतातून पळून गेला. त्यानंतर कोणत्याही ग्रीक राजाने भारताकडे वाकडी नजर केली नाही. त्याला कारणीभूत ठरले खारवेलचे देशप्रेम. ‘खरा शत्रू’ कोण हे खारवेलने वेळीच ओळखल्यामुळे परकीय शत्रूपासून मगध राज्याचे संरक्षण झाले.

No comments: