ते स्तोत्र व फलश्रुती येथे देत आहे. सर्वांनी लवकरात लवकर हे स्तोत्र कंठस्थ करून त्याचे विधिवत् पठण करावे व चहामृत-रूपी फलाची प्राप्ती करून घ्यावी, ही नम्र विनंती.

विद्यार्थी लभते डिप्-डिप्, धनार्थी लभते फुकट् |
आरोग्यार्थी-कृते गवती, मधुमेही शुगरफ्री मधुर् || १ ||
चहास्तोत्रम् महासिद्धम् प्रातर्नित्यम् पठन्ति ये |
न तद्-कृते दिनारम्भम् विना-चाहं युगे युगे || २ ||
सायं-प्रातः पठेन्यस्तु, लभेत् सदा आसाम-चहा |
त्रिसंध्यं यः पठेत् चापः, इच्छाचाही तु सः भवेत् || ३ ||
भावार्थ:
१. विद्यार्थ्याला डिप्-डिप् चहा, पैशाची चिन्ता करणार्याला फुकट, चांगल्या आरोग्याची कामना करणाऱ्याला गवती चहा, तर मधुमेही मनुष्याला शुगरफ्री साखरेचा पण गोड चहा, या स्तोत्राच्या पठणाने मिळतो.
२. हे महासिद्ध असे चहास्तोत्र जे रोज सकाळी म्हणतील, अनेकानेक युगांपर्यंत त्यांचा दिनारंभ चहाविना होणार नाही (रोज सकाळी उठल्यावर चहा नक्की मिळेल).
३. जो सकाळ-संध्याकाळ पठण करेल, त्याला सदैव आसाम चहा मिळेल. जो चाप (= चहा पिणारा) दिवसातून तीन वेळा हे स्तोत्र म्हणेल, तो 'इच्छाचाही' (=इच्छा करताच चहा प्राप्त करणारा) बनेल.
No comments:
Post a Comment